खाकी वर्दीत दिसली माणुसकी!!!!!         महिला पोलीस शिपायाने जखमी वृद्ध महिलेला उचलून नेले रुग्णालयात

खाकी वर्दीत दिसली माणुसकी!!!!! महिला पोलीस शिपायाने जखमी वृद्ध महिलेला उचलून नेले रुग्णालयात

मुंबई

पोलीस हे नाव उच्चारताच सामान्य नागरिकांना घाम सुटायला लागतो. पोलिसांपासून दोन हात दूर राहिलेलेच बरं,असे म्हणत अनेक जण पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचे टाळतात. पोलिसाची मैत्री आणि दुश्मनी हे ना परवडणारे आहे असा समाजात सामान्य नागरिकांचा झालेला असतो. पोलीस म्हणजे दरारा,गुंडांना झोडपून काढणारे मग आपला काय टिकाऊ लागणार असा सामान्यांचा समज झालेला आहे.

मात्र, मुंबईच्या महिला पोलीस शिपाईने कौतुकास्पद कार्य केलं आहे.नागरिकांच्या सर्व गैरसमजांना खोटं ठरवणारा प्रसंग मुंबईच्या खार दांडा परिसरात घडला आहे. खाकी वर्दीतही चांगला माणूस असतो याचा प्रत्यय मुंबईच्या खार येथील ७२ वर्षीय वेणूबाई वाते यांना आला आहे.

मुंबईच्या खार दांडा पश्चिमेकडील सप्तशृंगी निवास येथे वास्तव्यास असणाऱ्या वेणुबाई वाते आणि त्यांची सून यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती सुनेने मारहाण केल्यामुळे 72 वर्षीय वेणुबाई वाते या जखमी झाल्या होत्या.खारमधील मोबाईल वाहनास कंट्रोल रूम येथून यासंबंधीचा संदेश प्राप्त झाला होता. यानंतर पोलीस उपनिरीक्षक घोगरे, पोलीस शिपाई घारगे आणि पोलीस शिपाई म्हात्रे घटनास्थळावर पोहोचले. मात्र सुनेने केलेल्या मारहाणीमुळे ७२ वर्षीय वृद्ध वेणुबाई वाहते यांना हालचाल करता येत नव्हती.

यामुळे महिला पोलीस शिपाई म्हात्रे यांनी बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेस हाताच्या कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणून मुख्य रस्त्यापर्यंत आनुण सोडले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर वाहनातून वांद्रे येथील भाभा हॉस्पिटल या ठिकाणी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. यामुळे जखमी झालेल्या ७२ वर्षीय वेणुबाई वाते यांच्या डोळ्यातून अश्रू आले शिवाय हे सारे दृश्य पाहणाऱ्यांच्या देखील डोळ्यातून पाणी आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *