पुणे
शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत शिंदवणे घाट परिसरात दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे.
ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत घाटाच्या मध्यभागी एक स्त्री व पुरुष दोघेजण एका दुचाकीवरून आले होते घाट परिसरात आल्यावर महिलेने नवजात बालक रोडच्या कडेला ठेवून त्या ठिकाणावरुन निघून गेले.
ग्रामस्थ व पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले ऊरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात त्या मुलीला उपचारासाठी दाखल केले.
अज्ञात व्यक्तीवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहेत