खळबळजनक !!!!माळशिरसमध्ये पहिलीत शिकणारी मुलगी शाळेतून गायब

खळबळजनक !!!!माळशिरसमध्ये पहिलीत शिकणारी मुलगी शाळेतून गायब

सोलापूर

सोलापुरात पहिलीच्या वर्गात शिकणारी ६ वर्षाची एक मुलगी शाळेतून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावातील शाळेत २ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. यामुळे पालकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आदिती गणेश चौगुले असं बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे.

मुलगी गायब झाल्यानंतर वेळापूर पोलीस ठाण्यात शाळेच्या वतीने सोमनाथ पांडुरंग सगर यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिती खंडाळी येथील भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकते.

2 ऑगस्ट रोजी ती सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. दुपारच्या सुट्टीमध्ये आदितीने तिच्या मैत्रींसोबत जेवण केले. जेवणानंतर घरी जाऊन येते असं सांगून ती गेली होती. त्यानंतर आदिती शाळेत परत आलीच नाही.

आदितीच्या शिक्षकांनी व तिच्या घरच्यांनी शोध घेतला असता ती अद्याप सापडलेली नाही. या प्रकरणी शाळेतील शिक्षक सोमनाथ पांडुरंग सगर यांनी आदिती चौगुले हिला कोणीतरी अज्ञात कारणाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वेळापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आदितीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेमुळे खंडाळी व वेळापूर परिसरातील पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *