खळबळजनक !!!!!                                   पुरंदर तालुक्यातील “या” गावात सोसायटीच्या कर्जाच्या थकबाकीचे नोटीस आल्याने सोसायटीच्या सचिवाला घरी जाऊन केली मारहाण

खळबळजनक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात सोसायटीच्या कर्जाच्या थकबाकीचे नोटीस आल्याने सोसायटीच्या सचिवाला घरी जाऊन केली मारहाण

पुरंदर

विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचा थकबाकी वसुल वाढावा यासाठी पुणे जिल्हा सहकारी संस्था निबंधक यांच्या सुचनेप्रमाणे पुरंदर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या थकबाकीदार सभासदांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर या कार्यालयाकडून १०१ च्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र घरी नोटीस आल्याचा राग मनात धरून थकबाकीदार सभासदाच्या नातेवाईकाने सोसायटीच्या सचिवाच्या घरी जाऊन मारहाण करण्याची घटना पुरंदर तालुक्यातील राख येथे घडली असून या घटनेचा निषेध करून आरोपीला कठोर कारवाई होईपर्यंत लेखनीबंद आंदोलन पुरंदर तालुका सचिव संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राख सोसायटीचे सभासद दशरथ दत्तात्रय माने यांना सोसायटीच्या थकबाकी संदर्भात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर या कार्यालयाकडून १०१ ची नोटीस मिळाली. नोटीस घरी आल्याने माने यांचा नातू संदीप रामचंद्र माने याने मंगळवारी ( दि ३ ) राख सोसायटीचे सचिव श्रीकृष्ण संपतराव पवार यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण व शिविगाळ केली. यावेळी पवार यांच्या पत्नीलाही ढकलून देत शिवीगाळ केली. तसेच सोसायटीचे रजिस्टर फाडून टाकून सोसायटीचा लॅपटाॅप तोडला यावेळी रजिस्टर जवळ ठेवलेले सोसायटीचा भरणा करण्यासाठी आलेले १० हजार रुपये गहाळ झाल्याचे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. आरोपीवर भादवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गुरूवारी ( दि ५ ) पुरंदर तालुका सचिव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सासवड येथे बैठक झाली. याप्रसंगी राख येथील घटनेचा निषेध करून सदर आरोपी संदीप माने यावर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर, पुरंदर – हवेलीचे आमदार आणि जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहे. तसेच आरोपीवर कारवाई होईपर्यंत लेखनीबंद आंदोलन सचिव संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच या लेखणी बंदला मावळ व शिरुरने ही पाठिंबा दिला आहे. सदर बैठकीला पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, सचिव संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी रफिक शेख, तालुका सचिव संघटनेचे तुकाराम गायकवाड, हनीफ शेख, बंडू ताकवले, रवींद्र कांबळे, रसूल शेख, विजय कांबळे, तात्या गायकवाड, अमोल यादव, अमोल फडतरे, वैभव काकडे, राहुल घारे, राहुल जाधव, राजेश कुदळे, जालिंदर बाठे, ज्ञानेश्वर पवार, अजित जमदाडे, साहेबराव साळुंखे, तुषार ताकवले, गणेश दीक्षित, माऊली यादव, भरत शिंदे, विश्वास मुळीक, सोमनाथ चव्हाण, संपत शेंडगे, संतोष गुरव, तुषार काकडे, ज्ञानेश्वर तांबे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *