खळबळजनक !!!!!                                   पुरंदर तालुक्यातील “या” गावात दशक्रिया विधीसाठी निघालेल्या दांम्पत्यावर काळाचा घाला;भीषण अपघातात लवांडे पती पत्नीचा मृत्यू

खळबळजनक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात दशक्रिया विधीसाठी निघालेल्या दांम्पत्यावर काळाचा घाला;भीषण अपघातात लवांडे पती पत्नीचा मृत्यू

पुणे

पुण्यातल्या विचित्र अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रज-कोंढवा रोडवर झालेल्या अपघातात पती पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे. दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दशक्रिया विधी जात असतानाच हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.कात्रज-कोंढवा रोडवर इस्कॉन टेंपल चौकाजवळ आरएमडी शाळेसमोर सकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

या अपघातात ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (50) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (45) अशी मृत दाम्पत्याची नावे असल्याचे समोर आले आहे. दोघेही पती-पत्नी सकाळी अॅक्टीव्हा दुचाकीवरून दशक्रिया विधीसाठी जात होते.

त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.लवांडे दाम्पत्य हे बाणेरवरुन कोथळे पुंरदरकडे दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या एमएच 12 व्हीएच 9789 या अॅक्टीव्हा दुचाकीवरून जात होते.

यावेळी कात्रज कोंढवा रस्त्यावर इस्कॉन टेंम्पल चौकाजवळील आरएमडी शाळेसमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच कोंढववा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *