खळबळजनक !!!!!                                   पुरंदर तालुक्यातील “या” गावात अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली इनोव्हा कार; कार पुर्णपणे जळून खाक

खळबळजनक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली इनोव्हा कार; कार पुर्णपणे जळून खाक

पुरंदर

पिंपळे (ता पुरंदर) येथे गणेश बबन खेनट यांच्या घरासमोर सासवड ते वीर रस्त्याच्या कडेला टोयाटा कंपनिची इनोव्हा कार पार्क केली होती ती अज्ञात व्यक्तींने पेटवून दिली ही घटना रात्री ३:०० सुमारास घडली असून सुदैवाने जिवितहानी झाली नाही.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गणेश बबन खेनट पिंपळे (ता पुरंदर) याबाबत फिर्याद दिली आहे पिंपळे येथील गणेश खेनट यांच्या घरासमोर सासवड-वीर रस्त्याच्या कडेला टोयोटा कंपनीचे इनोव्हा कार नंबर एम.एच ०२ ए.यू ०३४१ रात्री तीन चा सुमारास आज्ञात व्यक्तीने पेटून दिली तसेच रात्री नोकरीनिमित्त या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक गाडी पेटत असताना दिसली त्यांनी ताबडतोब माझ्या घराचा दरवाजा वाजवला मी घराच्या बाहेर आले असता मला माझी गाडी पेटत असताना दिसली तसेच मी ही आग विझवण्याचा व आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु ही आग आटोक्यात न आल्याने माझी इनोव्हा कार पूर्णपणे जळून खाक झाली माझे खूप मोठे नुकसान झाले आहे तरी माझी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद आहे

दरम्यान मी ऑक्टोंबर २०२२ मध्ये विक्रोळी मुंबई येथील कार बाजार येथून दिलीप काशिनाथ राठोड रा. बी. २१ दिशा कॉम्प्लेक्स ओ.पी हौसिंग सोसायटी दुसरा मजला साईनगर जुने पनवेल, मुंबई ४१०२०६ यांची टोयोटा कंपनीची इनोव्हा कार नंबर एम.एच ०२ ए.यू ०३४१ मी ३ लाखात विकत घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *