खळबळजनक !!!!     पुणे जिल्ह्यातील “या” गावात डोक्यावर गांजाचं पोतं घेऊ निघाल्या सासू-सूना ; पोलिसांनी केली कारवाई, तब्बल चार लाखाचा गांजा मिळाला

खळबळजनक !!!! पुणे जिल्ह्यातील “या” गावात डोक्यावर गांजाचं पोतं घेऊ निघाल्या सासू-सूना ; पोलिसांनी केली कारवाई, तब्बल चार लाखाचा गांजा मिळाला

पुणे

चक्क पोत्यामध्ये गांजा घेऊन निघालेल्या सासू-सुनेला पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडे तब्बल ४ लाख रुपयांचा गांजा मिळून आला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक १ ने ही कारवाई केली. लोणीकाळभोर परिसरातून दोघी सासू-सुनेला ताब्यात घेतलं आहे. सोरतापवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर दोन महिला डोक्यावर नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये गांजा घेऊन जात होत्या. त्यांनी पोलिसांना सुरुवातील उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी पोत्यांची झडती घेतली असता एका महिलेच्या पोत्यात २ लाख रुपये किंमतीचा १० किलो २४५ ग्रॅम गांजा आढळून आला तर दुसऱ्या महिलेकडे २ लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा १० किलो गांजा मिळून आला.

सासू-सुनेकडे २० किलो ६१० ग्रॅम गांजा सापडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढीत तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *