खळबळजनक !!!!!तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील निलंबित

खळबळजनक !!!!!तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील निलंबित

पुणे

तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाची खातरजमा न करता हडपसर येथील वन जमीन संबंधित अर्जदाराला प्रदान करणे करोणा काळात जीवनाशक वस्तूची खरेदी आणि आवश्यक सेवा सुविधा यामध्ये आर्थिक अनियमितता,पुणे शहराच्या तहसीलदार असताना नियमबाह्य कामकाजा आणि निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्राप्त गंभीर तक्रारींचा ठपका ठेवून हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्यावर निलंबलाची कारवाई करण्यात आली आहे.

ज्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले किरण सुरवसे यांची हवेली तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव संजीव राणे आणि डॉक्टर माधव वीर यांनी जाहीर केले.

विभागीय आयुक्त सौरव राव यांनी 2 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या आहवालानुसार कोलते यांनी हडपसर येथील सर्वेक्षण क्रमांक 62 या जमिनी बाबतच्या तत्कालीन महसूल मंत्री यांच्या आदेशाची खातर जमा न करता तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्हाधिकारी यांचे अभिप्राय आदेश प्राप्त न करता कार्यक्षे कक्षेच्या बाहेर जाऊन संबंधित अर्जदारास राखीव वनसंवर्गातील जमीन प्रदान केल्याच्या आदेश 12 जुलै 2021रोजी दिला होता.

तसेच विभागीय आयुक्त राव यांच्या 23 मे रोजीच्या अहवालात कोलते यांनी कोरोना काळा जीवनावश्यक वस्तूची खरेदी करताना आणि आवश्यक सेवा सुविधा प्राप्त करून घेताना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीचा अवलंब न करता वित्तीय अनियमित्ता केल्याचे निदर्शनास आले तसेच पुणे शहराच्या तहसीलदार असताना प्रकाश बिजलानी व इतर यांच्या प्रकरणात नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले याशिवाय कोलते यांच्याविरुद्ध निवडणुकवुषयक कामकाज बाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाले आहेत त्यामुळे कोलते यांना निलंबित केल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *