खळबळजनक!!!!!!!!डॉक्टर दांपत्यात कडाक्याचं भांडण; पत्नीनं थेट घरालाच लावली आग

खळबळजनक!!!!!!!!डॉक्टर दांपत्यात कडाक्याचं भांडण; पत्नीनं थेट घरालाच लावली आग

पुणे

छत्रपती संभाजीनगरमधील मुकूंदवाडी परिसरातील एपीआय कॉर्नर येथील नालंदा कॉम्प्लेक्स येथे कौटुंबिक वादानंतर पत्नीने थेट घरातील साहित्य पेटवून दिल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली.

तिसर्‍या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमुळे भितीने अपार्टमेंटमधील एकच गोंधळ उडाला. यावेळी नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एपीआय कॉर्नर येथील नालांदा कॉम्प्लेक्समधील फ्लॅट नंबर १२ मध्ये डॉ. गोविंद सुभाषराव वैजागडे (४०) हे कुटुंबासोबत राहतात. दरम्यान सोमवार दि. २९ रोजी डॉ. गोविंद आणि त्यांचे पत्नी डॉ. विनिता वैजागडे यांच्यात भांडण झाले. वाद विकोपाला गेला अन् दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

दोघांमध्ये सुरू असलेल्या वादानंतर पत्नी विनिताला राग अनावर झाल्याने तिने घरातील कपडेसह साहित्य पेटून दिले. या आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीचा धूर बाहेर पडल्याने आग लागल्याचे अपार्टमेंटमधील नागरिकांच्या लक्षात आले.या आगीचे लोट खिडकी बाहेर पडत असल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

तसेच अपर्टमेंटमधील इतर रहिवासांनी एकच धावपळ सुरू केली. दरम्यान, घरात लागलेली आग लक्षात घेऊन डॉ. गोविंद वैजागडे यांनी मनपाच्या अग्निशमन विभागाला कॉल करून माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी डॉ. गोविंद वैजागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकूंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भिडे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *