खळबळजनक!!!!आधी मृत साप,आता पोषण आहारात आढळली उंदराची विष्ठा

खळबळजनक!!!!आधी मृत साप,आता पोषण आहारात आढळली उंदराची विष्ठा

पुणे

सांगलीतील शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील बलगवडेमध्ये येथील शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सांगलीतील पलूसमध्ये यापूर्वी शालेय पोषण आहारामध्ये मृत साप आढळून आला होता. त्यानंतर आता या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.सांगली जिल्ह्यातीलच तासगाव तालुक्यातील बलगवडेमध्ये शालेय पोषण आहारात उंदराची विष्ठा सापडल्याने एकच चर्चा सुरू आहे.

बलगवडेमधील एका विद्यार्थ्याला शालेय पोषण आहार देण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय पोषण आहाराची पिशवी घरी नेली. घरात नेऊन पिशवी उघडून बघितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाराज्यभरामध्ये अनेक ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये काही ना काही धोकादायक आढळत असल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रभरात आतापर्यंत समोर आल्या आहेत.

सांगलीमध्ये मृत सापानंतर आता शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा सापडली, त्यामुळे शासनाचा शालेय पोषण आहारामार्फत अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात सर्वत्रच शालेय पोषण आहारामध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळत असल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नंदुरबार इथे अंगणवाडीतील मुलासाठी असलेल्या पोषण आहारात अळ्या आढळल्या होत्या. त्यानंतर याबाबत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला माहिती देण्यात आली. त्याआधी नवापूर तालुक्यातील ढोंग जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारात दगडी-खडी आढळल्या होत्या. अकोल्यातील मूर्तीजापूर तालुक्यात तर चक्क मुदतबाह्य अर्थात एक्सपायर्ड पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं होतं.

वारंवार अशा घटना महाराष्ट्रभरातून समोर आल्या आहेत. तसंच याआधी छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमधील वांगी बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारातील तांदळामध्ये उंदराची विष्ठा तसंच अळ्या आढळल्या होत्या. सततच्या या घटनांमुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोषण आहारातून मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक वर्गाकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *