क्रूरतेचा कळस !!!!! दिव्यांग मुलीने खाटेवर शौच केल्यामुळं नराधम बाप संतापला ; रागाच्या भरात त्याने मुलीचा गळाच आवळला

क्रूरतेचा कळस !!!!! दिव्यांग मुलीने खाटेवर शौच केल्यामुळं नराधम बाप संतापला ; रागाच्या भरात त्याने मुलीचा गळाच आवळला

चंद्रपूर

जिल्ह्यात शामनगरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. बापानेच दिव्यांग मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यांग मुलीने खाटेवर शौच केल्यामुळं नराधम बाप संतापला आणि रागाच्या भरात त्याने मुलीचा गळा आवळला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विजय बारापात्रे (46) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शामनगरमध्ये धक्कादायक घटना घडलीय.

नराधम बापाने दिव्यांग मुलीने खाटेवर शौच केले म्हणून तिची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती बिघडल्याचे सांगत तिला रुग्णालयात दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषीत केलं. मृत पावलेल्या मुलीच्या गळ्यावर जखमा असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल गोपाले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *