पुरंदर
शेंडकर पिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटी लि.शेंडकर पिंपरी या संस्थेची विशेष सभा मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर यांच्या आदेशानुसार दि.25/3/2023 रोजी 12.30 वा. संचालक मंडळाची सभा पुरंदर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ कार्यालय मार्केट यार्ड सासवड या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
तत्कालीन चेअरमन विजय थेऊरकर व व्हाय चेअरमन विठ्ठल आबा शेंडकर यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यासाठी सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन मा. के.बी. धस सहकारी अधिकारी श्रेणी 1 यांच्या उपस्थित निवडणुक प्रक्रीया सुरू झाली चेअरमन पदासाठी कृषिभुषण महादेव शेंडकर व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रविण मारणे यांचा एकमेव अर्ज आल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी यांनी कृषिभुषण महादेव शेंडकर यांची चेअरमन पदी व प्रविण मारणे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी संस्थेचे संचालक विजय थेऊरकर,संपतदादा शेंडकर,विठ्ठलआबा शेंडकर ,बाबुराव शेंडकर,सुखदेव हंबीर,संतोष गायकवाड ,अशोक सोनवणे,शंकर शेंडकर,शंकर शेंडकर, महादेव मोघे,शितल चव्हाण,शोभा हंबीर व संस्थेचे सचिव सदानंद थेऊरकर उपस्थित होते.
कृषिभुषण महादेव शेंडकर हे 2005 पासुन ते राजकारणात सक्रीये झाले 2007 ते 2009 मध्ये या संस्थेचे चेअरमन म्हणुन त्यांनी काम पाहिले.2009 साली मा.आमदार अशोकभाऊ टेकवडे यांनी राष्ट्रवादी काॕग्रेस चे तालुका उपअध्यक्ष म्हणुन काम करण्याची संधी दिली.
विशेष कार्यकारी अधिकारी,पाॕलीहाऊस शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य सरकारने 2013 ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मा.राज्यपाल यांच्याहस्ते राज्यस्तरीय कृषिभुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अशा विविध पदावरती महादेव शेंडकर यांनी काम पाहिले होते.
त्यांची निवड झाल्यामुळे पुरंदर हावेलीचे आमदार संजयजी जगताप, मा.आमदार अशोकभाऊ टेकवडे,जिल्हा परिषद बांधकाम समितीचे मा.सभापती दत्ताआबा चव्हाण,भाजपाचे तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे,युवा नेते आजिक्यभैया टेकवडे यांनी अभिनंदन केले.पिंपरी ग्रामस्थं यांच्यावतीने चेअरमन महादेव शेंडकर व व्हाईस चेअरमन यांचा भैरवनाथ मंदीरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.