काञज – सासवड मार्गावरिल पी.एम.पी वाहतुकीचा खेळखंडोबा !!!!!!!      मिडीबसेसच्या ब्रेकडाउन संख्येत वाढ ,वेळापञक फक्त नावालाच

काञज – सासवड मार्गावरिल पी.एम.पी वाहतुकीचा खेळखंडोबा !!!!!!! मिडीबसेसच्या ब्रेकडाउन संख्येत वाढ ,वेळापञक फक्त नावालाच

पुणे (प्रतिनिधी)

शहरातील काञज पी.एम.पी  आगारातुन -बोपदेव घाट- सासवड मार्गावरील पी.एम.पी बसेसची संख्या निम्यापेक्षा कमी केल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. वेळापञकाप्रमाणे बसेस नसल्यामुळे पी.एम.पी बसेस प्रवाशांनी ओव्हरलोड होत आहेत ,परिणामी बसेसच्या ब्रेकडाउन संख्येत मोठी वाढ झाली आहे, अर्ध्या रस्त्यातच बस बंद पडत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाचे वेळापञक तर फक्त नावालाच असल्याचे दिसत आहे, प्रशासन आपल्या सोयीनूसार बस मार्गावर पाठवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

काञज -सासवड मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे , बस वेळेवर नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. सासवड शहरातुन तसेच हिवरे , चांबळी, बोपगाव ,भिवरी गावांमधील बसस्टाॅप  तसेच काञजला  जाण्यासाठी कोडीत वरुन चांबळी मध्ये तसेच गराडे मधुन भिवरी मध्ये  प्रवाशी या मार्गावर ये -जा करत  असतात.सिंहगड काॅलेज ,अंगराज ढाबा , खडीमशीन चौक या मार्गावरिल  महिला भगिनी ,कामगार  वर्ग ,नियमित  तिकीटाबरोबरच पासधारकांची संख्याही मोठी आहेत .

दोन वर्षोपुर्वी पासुन सुरु असलेली काञज-बोपदेव घाट मार्गावर वीस ते पंचवीस मिनिटांची सेवा महामंडळ नियमित आणि वेळापञकानूसार पुरवु शकत नाही त्यामुळे ,घाटरस्त्याने मिडीबसमध्ये पन्नास- पंच्चावन्न प्रवाशी घेवुन घाट रस्ता पार करावा लागत आहे ,अलीकडच्या काही दिवसांपासुन मिडीबस ब्रेकडाउनच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, पी.एम.पी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशांना धोकादायक प्रवासाबरोबरच मोटार वाहन कायदा ,करोना प्रतिबंध मार्गदर्शक नियम ,आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पी.एम.पी कडुनच उल्लघंन होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

सासवड- बोपदेव घाट मार्गावरिल नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांनी यापुर्वी हेल्पलाईन नंबर ,व्हाटसअप आणि व्हिडीओदवारे यामार्गावरिल तक्रारी पी.एम.पी प्रशासनाकडे केल्या आहेत , तरी देखील काहीही कार्यवाही होत नाही ,नोकरी आणि  कामांपेक्षा  प्रवास हा विषय गंभीर झाला आहे.

पी.एम.पी प्रशासनाने प्रवाशांशी उत्तरदायी राहण्यासाठी हेल्पलाईन विभाग सुरु आहे, प्रशासनाकडुन फक्त तक्रार नोंदवुन घेणंच काम आहे का? तक्रारीची दखल घेण काम नाही का? ओव्हरलोड बसेसमुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का ? असे अनेक सवाल या मार्गावर नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांनी केले आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अर्ध्यातासाच्या अंतराने , सुस्थितीत असणार्‍या बसेस मार्गावर पाठविण्याची मागणी दैनंदिन प्रवाशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *