ऑनलाईन कोविड कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद.

ऑनलाईन कोविड कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद.

पुरंदर

कोरोनाचा धोका,खबरदारी,उपाय व लसीकरण या बाबत सरपंच परिषदेचे प्रतिनिधी,सामाजिक संस्था व संघटनांचेप्रतिनिधीनी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेला नागरिकांचा उस्पूर्त प्रतिसाद मिळाला.  

कोरोना विरोधी जन अभियान पुणे आणि आंबेगाव,जुन्नर,पुरंदर,भोर,वेल्हे तालुक्याच्या सरपंच परिषदेचे प्रतिनिधी वस्थानिक संस्था,संघटनांचे प्रतिनिधी यांच्या वतीने नुकतीच कोविड विषयक ऑनलाईन कार्यशाळेला आरोग्य हक्कचळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ.अनंत फडके व रोग प्रतिकारशक्ती तज्ञ डॉ.विनिता बाळ यांनी मार्गदर्शन केले.

 मासूम संस्थेच्या जया नलगे यांनी प्रास्ताविक केले तर काजल जैन यांनी आभार प्रदर्शन केले.

कोविड च्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी पूर्ण गावाचे लसीकरण वेगात करून घ्यावे,गाव पातळीवर विलगिकरणकक्ष गरजेनुसार येत्या काळात तातडीने सुरू करता यावेत यासाठी  सरपंचांनी पुढाकार घ्यावा.खाजगी रुग्णालयातहोणाऱ्या कोविड साठीच्या खर्चावर नियंत्रण आणले जावे व त्यासाठी अंकेक्षण (ऑडिट)  प्रक्रियेत सरपंच प्रतिनिधींनीसहभागी व्हावे इत्यादी मुद्द्यांवर कार्यशाळेच्या माध्यमातून चर्चा झाली.

 रचना संस्थेचे श्रीपाद कोंडे व मासूम संस्थेच्या काजल जैन यांनी सरपंच व उपसरपंचांच्या माध्यमातून कोविड साथ वलसीकरण विषयक समस्या निराकरणासाठी गावापासून ते तालुका पातळीपर्यंत पाठपुरावा करण्याचे आवाहन  केले.

     किसान सभेचे अमोल वाघमारे यांनी आदिवासी भागात या कार्यशाळे साठी विशेष संपर्क साधला. उत्तम टाव्हरे,अशोकपेकारी,अशोक सरपाले,विजय गरुड,रेखाताई टापरें,विश्वनाथ निगळे व सरपंच परिषदेचे इतर सदस्य यांच्या सहकार्यानेहा उपक्रम राबविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *