एमपीएससीची पोस्ट नाही निघाली तर पंचायत समितीची निवडणूक लढवा; “या” आमदारांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

एमपीएससीची पोस्ट नाही निघाली तर पंचायत समितीची निवडणूक लढवा; “या” आमदारांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

पुणे

एमपीएससीची पोस्ट नाही निघाली तर पंचायत समितीची निवडणूक लढवा असा अजब सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी MPSCच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. पुण्यात गुरुवारी ते स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

यावेळी त्यांनी हा अजब सल्ला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे.गोपीचंद पडळकर म्हणाले, एमपीएससी निघाली नाही तर निराश होऊ नका, गावाकडे जाऊन निवडणूक लढवा. एमपीएससीला खूप स्पर्धा आहे. जवळपास २०-२१ तास मुलं अभ्यास करतात. तर, तुम्ही नैराश्यात जाऊ नका, निराश होऊ नका.

इथं तुम्हाला संधी नाही मिळाली तरी गावाकडं अनेक संध्या आहेत. त्या संध्यांचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. एमपीएससीचा पोरगा गावचा सरपंच झाला तर बिघडलं कुठं? एमपीएससीचा पोरगा गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे.

पडळकरांच्या या अजब सल्ल्याची सध्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चर्चा होतेय.गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, मी वयाच्या २२ व्या वर्षापासून कार्यकर्ता म्हणून फिरतो आहे. विद्या ताई यांनी माहिती घ्यायला हवी. एमपीएससीबाबत आज चर्चा झाली. ५ आमदार आज या संवादामध्ये सामील होते. एमपीएससीला खूप स्पर्धा आहे म्हणून तुम्ही नैराश्यात जाऊ नका.

एमपीएससीचा विद्यार्थी गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे? असं पडळकर म्हणाले. तसेच सोमवारी एमपीएससीबाबत एक बैठक घेणार आहोत. एमपीएससी सदस्य निवडीसाठी ओपन, एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती यांना प्राधान्य द्यावं अशी आमची मागणी आहे असंही पडळकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *