उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरीमध्ये  मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरीमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन.

शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेजयदीप बारभाई

मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जयदीपभैय्या बारभाई मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जेजुरी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यातआलेले आहे.

मागील  एक ते दोन महिन्यांपासून जेजुरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या  चिकन गुनीया ,गोचिड ताप,  डेंग्यूयासारख्या  आजारांमुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊनमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २२ जुलै रोजी जयमल्हारसांस्कृतिक भवन जेजुरी येथे   सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत  शहरामधील नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी वऔषधोपचार करण्यात येणार आहे.

या शिबीरमध्ये येणाऱ्या रुग्णांना चहा, बिस्किट व फलाहार अशी संपूर्ण मोफत व्यवस्था आयोजकांमार्फत केलेली आहे. तरी जेजुरीतील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली मोफत तपासणी करून घ्यावी अश्याप्रकारचे आवाहन जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जयदीप भैय्या बारभाई मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आलेआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *