उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण

सोलापूर

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दादरमधील शिवाजीपार्कवर आहे. शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट दसरा मेळाव्याची तयारी करत आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रर्शन करण्यात येत आहे.

त्यामुळे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडल्यासारखे आरोप,टोलेबाजी करत आहेत. तर बाकीचे नेतेही या दसरा मेळाव्यावरून भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.अशातच आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण दिल्याचा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. उद्या दसरा मेळाव्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी वरील दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यावेळी शिंदे गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.आमचीच शिवसेना खरी असल्याचं दाखवण्याचा यावेळी प्रयत्न होणार आहे.

त्यामुळे शिंदे या मेळाव्यात काय बोलतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्या या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून ३० ते ३५ हजार शिवसैनिक जाणार असल्याची माहिती शहाजीबापू यांनी दिली. दरम्यान रोहित पवार यांनी ठाकरे यांच्या मेळाव्याला शिंदे गटाच्या मेळाव्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी असणार असल्याचे म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *