इंद्रायणीनगर परिसरातील मोबाईल टॉवर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते कार्यान्वयीत

इंद्रायणीनगर परिसरातील मोबाईल टॉवर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते कार्यान्वयीत

नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे यांचा पुढाकार
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड

इंद्रायणीनगर आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची सुविधा असलेल्या मोबाईल टॉवरचे अखेर लोकार्पण करण्यात आले. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत नेटवर्क सुविधा सुरू करण्यात आली.

मोबाईल नेटवर्क ही परिसरातील नागरिकांची मोठी समस्या हेती. सेक्टर ६, ९ आणि ११ मधील नागरिक गेल्या चार-पाच वर्षांपासून याबाबत तक्रारी करीत होते. मात्र, मोबाईल टॉवरसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. अखेर सेक्टर ६ मधील आरटीओ कार्यालयाजवळील प्रीव्हिया बिझनेस सेंटरचे भीमजी पटेल यांच्याशी सतत पाठपुरावा करुन मोबाईल टॉवरसाठी जागा उपलध केली. त्यानंतर नेटटेल कंपनीचे अरुण पांडे यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन परवानगीही घेतली. आता या मोबाईल नेटवर्क सुविधेचे लोकार्पण होत आहे, याचे समाधान वाटते : नम्रता लोंढे,नगरसेविका पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, नगरसेविका नम्रता लोंढे, नेटटेल कंपनीचे अरुण पांडे, प्रीव्हिया बिजनेस सेंटरचे सर्वेसर्वा भीमजी भानुशाली, धवल भानुशाली, अनिल सौन्दडे, ॲड. विकास जाधव, बाप्पू घोलप, नवनाथ सांगळे, धीरज शिंदे, श्रीकांत पोतदार, संतोष वरे, घनवट, महिंद्रकर, बाळासाहेब मोरे, संतोष गाढवे, सतिष शिंदे, अनिल ढोले, त्रिपाठी अंकल, बागवान चाचा, बबन भोर, जालिंदर शिनगारे,चव्हाण, वाघोडे, तिखे, तावरे, घोलप, इचके, पोटे, ताम्हाणे, वाघ,जाधव, खिलारे, राजू आनंदा, श्री. नारायण आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *