आनंददायी !!!! राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ ……

आनंददायी !!!! राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ ……

मुंबई

राज्य सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायत मधील कुशल कर्मचाऱ्याला किमान बारा ते चौदा हजार रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात आला आहे. ज्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे त्या ग्रामपंचायतीमधील कुशल कर्मचाऱ्याला 14 हजार 125 रुपये, अर्धकुशल कर्मचाऱ्याला 13 हजार 420 व अकुशल कर्मचाऱ्याला 13 हजार 85 रुपये वेतन मिळेल.

ज्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या पाच ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील कुशल कर्मचाऱ्याला 13 हजार 760, अकुशल कर्मचाऱ्याला 13 हजार 55 रुपये, अकुशल कर्मचाऱ्याला 12 हजार 715 रुपये वेतन मिळेल आणि पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील कुशल कर्मचाऱ्याला 12 हजार 665 रुपये, अर्धकुशल कर्मचाऱ्याला 11 हजार 960 रुपये आणि अकुशल कर्मचाऱ्याला 11 हजार 625 रुपये वेतन मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *