आज होणार आंबळे येथे श्री काळभैरवनाथ उत्सवमुर्तिची प्राणप्रतिष्ठापणा

आज होणार आंबळे येथे श्री काळभैरवनाथ उत्सवमुर्तिची प्राणप्रतिष्ठापणा

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे येथील जागृत देवस्थान म्हणुन ओळख असणार्या श्री काळभैरवनाथ यांच्या उत्सवमुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आज करण्यात येणार आहे.

तत्पुर्वी काल उत्सवमुर्तीचे शाही स्वागत व पारंपारिक पद्धतीने जंगी मिरवणुक काढण्यात आली.”हाची सुख सोहळा स्वर्गी नाही” या उक्तीची प्रचिती आंबळे गावातील प्रत्येक नागरिकाला आली.

डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी ही जंगी मिरवणुक काढण्यात आली होती.या मिरवणुकीसाठी पुरुषांपेक्षाही महिलांची उपस्थिती लाक्षणिक होती.

आज उत्सवमुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यावर उत्सवमुर्तीची ग्रामप्रदक्षिणा होऊन भव्य अशी पालखी मिरवणुक होणार आहे.संध्याकाळी ९ ते १२ या वेळेत आदिनाथ चव्हाण याचा भैरवनाथाचे भराड हा धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे भैरवनाथ चैत्री उत्सव कमीटीने सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *