आख्खा पुरंदर हळहळला!!!!!  लग्नाचा चाळीसावा वाढदिवस थाटामाटात केला,पण नियतीने घातला घाला; सोन्यासारखा देव माणूस दोन महिन्यातच गेला

आख्खा पुरंदर हळहळला!!!!! लग्नाचा चाळीसावा वाढदिवस थाटामाटात केला,पण नियतीने घातला घाला; सोन्यासारखा देव माणूस दोन महिन्यातच गेला

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे गावचे रहिवासी तसेच जनता शिक्षण संस्था पुणे येथील निवृत्त सेवक विनायक केरबा गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले.

अत्यंत शांत, प्रेमळ, मायाळू असा त्यांचा स्वभाव होता. आजपर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत कोणालाही ते रागावलेले नव्हते.
सर्वात विशेष म्हणजे सात जुलैला त्यांच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो गगनात मावत नव्हता.

पण मी नियतीच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. त्यानंतर त्यांना फक्त दोनच महिने आनंदात जगता आलं. व बरोबर दोन महिन्यांनीच म्हणजे सात सप्टेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली.

विनायक गायकवाड यांनी आपल्या आयुष्यातील 37 वर्षे जनता शिक्षण संस्था पुणे या संस्थेत सेवा दिली. त्यांच्या सेवेत कायम प्रामाणिकपणा दिसून आला.

अत्यंत सुखी व विकसित कुटुंब म्हणून विनायक गायकवाड यांच्या कुटुंबाची पंचक्रोशीत नव्हे तर पूर्ण तालुक्यात ओळख होती. त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला आहे.

विनायक केरबा गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे.


आंबळे गावचे माजी सरपंच तसेच पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव व संजीवनी न्यूज चे कार्यकारी संपादक मंगेश गायकवाड यांचे ते वडील तर आंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या व संजीवनी न्यूज च्या मुख्य संपादिका संजीवनी गायकवाड यांचे ते पती होत.

विनायक केरबा गायकवाड यांचा पुण्यानुमोदनाचा विधी बुधवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी होणार आहे.

MISS U बाबा 😢😢😢😢😢😢

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *