आंबळे गावात श्री संत बाळूमामाच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत

आंबळे गावात श्री संत बाळूमामाच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या आंबळे या ठिकाणी श्री संत बाळूमामाच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आंबळे गावाशेजारी असणाऱ्या पिसर्वे येथून बाळूमामाच्या पालखीला पिसर्वे ग्रामस्थांनी मोठ्या आनंदात निरोप दिला.बाळूमामाच्या पालखीच्या स्वागताला आंबळे गावातील ग्रामस्थांनी खूप मोठ्या संख्येने हजेरी लावली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुर चे बाळूमामा हे देवअवतारी बाळूमामा म्हणून ओळखले जातात. त्यांना साक्षात पांडुरंग प्रसन्न झाला अशी आख्यायिका आहे. बाळूमामाच्या पालखी बरोबर बाळुमामाची बकरी मेंढ्या तसेच घोडा यांचे वाजत गाजत भंडाराची उधळण करीत आंबळे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

सुमारे दहा वर्षांपूर्वी बाळुमामाची पालखी व बकरी आंबळे गावी आले होते.आता दहा वर्षानंतर पुन्हा एकदा आंबळे गावात बाळूमामाच्या पालखीचे व बकऱ्यांचे आगमन झाल्याने आंबळे गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आंबळे गावात आजच्या दिवसाची अन्नदानाची सेवा ही दरेकर मळा येथील ग्रामस्थांनी केलेले असून उद्या होणारी अन्नदानाची सेवा ही आंबळे गावातील सणसमळा व संत कृपा रोडलाईन्स यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *