आंबळे गावात लान्सनाईक निलेश बधे यांच्या सेवानिवृत्तीचा दिमाखदार सोहळा संपन्न

आंबळे गावात लान्सनाईक निलेश बधे यांच्या सेवानिवृत्तीचा दिमाखदार सोहळा संपन्न

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे येथील लान्सनाईक निलेश वसंत बधे यांनी भारतमातेच्या रक्षणार्थ १७ वर्षे केलेल्या अखंड सेवेचा गौरव करण्यासाठी अजितदादा पवार प्रतिष्ठानच्या वतीने सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

माजी सैनिक संघटना पुरंदर तालुका व अजितदादा पवार प्रतिष्ठानच्या वतीने हा भव्य असा सत्कार सोहळा आंबळे गावच्या ईतिहासात पहिल्यांदाच निलेश बधे यांचा त्याच्या कुटुंबासमवेत सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.

निलेश बधे यांच्या सत्काराबरोबरच आंबळे गावातील आजपर्यत हयात असणारे ज्यांनी भारतमातेची सेवा केली आहे अशा सर्वच फौजींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी आंबळे गावचे मा.सरपंच सुभाष जगताप,मंगेश गायकवाड,शशिकांत दरेकर,अजितदादा पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित जगताप,मधुकर ढोले,राजश्री थोरात,प्रकाश दरेकर,किसन बधे,गुलाब जगताप,मा.सैनिक त्रिंबक दरेकर,सतिश कुंजीर,नवनाथ जगताप,अतुल जगताप,नामदेव कुंभारकर,वसंत ताकवले,बबन मेमाणे, प्रदिप जगताप,नाजीम शेख़,संजय सणस,शरद दरेकर तसेच सर्व आंबळे ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच सचिन दरेकर यांनी केले तर सुत्रसंचालन राजेंद्र दरेकर यांनी केले व आभार अजित जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *