आंबळे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर तर उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप

आंबळे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर तर उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात असणार्या ऐतिहासिक आंबळे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर तर उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.

दि. ०३/११/२०२२ रोज़ी होणारी ग्रामसभा गणमोजणी अभावी तहकुब झाली होती.दि. ११/११/२०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेस ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

तत्कालीन तंटामुक्ती समिती अध्यक्ष शिवाजी सणस यांनी अध्यक्षपदाच्या काळात खुप चांगल्या प्रकारे काम केले परंतु गावातील नविन ग्रामस्थाला हे पद द्यावे असे सांगीतल्याने ग्रामसभेच्या अध्यक्ष व गावच्या सरपंच राजश्री थोरात यांनी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय ग्रामसभेपुढे मांडला.

नंदकुमार दरेकर व प्रदिप जगताप यांनी अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगीतले.त्यानंतर या दोन इच्छुकांमध्ये समेट घडवुन आणत अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर यांची नियुक्ति झाल्याचे आंबळे गावच्या सरपंच राजश्री थोरात यांनी जाहिर केले.

यावेळी उपसरपंच सचिन दरेकर,सदस्य अजित जगताप,मधुकर ढोले,विठ्ठल जगताप,मुक्तबाई जगताप,संगीता कुंजीर,दिलीप जगताप तसेच मा. सरपंच किसन बधे,सुभाष जगताप,शशिकांत दरेकर,मंगेश गायकवाड,प्रकाश दरेकर,गुलाब जगताप,नंदकुमार जगताप,मारुती जगताप,नितीन जगताप,अजित जगताप,आशिष सणस,नितीन ढोले,पोलिस पाटील जयश्री बधे,गावकामगार तलाठी प्रियांका जाधव, ग्रामसेवक गोरोबा वडवले आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *