अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी पोलीस पाटील यमुना मरगळे  यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी पोलीस पाटील यमुना मरगळे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

पुणे

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी पोलीस पाटील यमुना भाऊसाहेब मरगळे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे, माय होम इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पूनमताई मेहता व युवा कीर्तनकार जोत्स्नाताई गाडगीळ हस्ते प्रदान करण्यात आला आहे, समाजाच्या अनेक क्षेत्रात आज नैतिक ह्रास होताना दिसत आहे. स्वार्थाचा विचार बळावत आहे.

स्वतः पलीकडे जाऊन आपल्या परिसरासाठी, समाजासाठी व देशासाठी थोडे जरी काम केले तरीही समाज उन्नत होईल. या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व सावित्रीबाई फुले यांच्या श्रेष्ठ कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी व अहिल्यादेवी होळकर या दूरदृष्टी लाभलेल्या शासक होत्या असे सांगून अहिल्यादेवींनी त्याकाळी अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे, नदी घाट सुधारण्याचे देखील काम केले असे प्रतिपादन बाबा शिंदे यांनी केले.


आज देखील समाजात अन्न, वस्त्र, औषध व निवाऱ्यासह मूलभूत सुविधांपासून अनेक वंचित लोक आहेत म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने समाजसेवेचे छोटेसे कार्य जरी केले तरी देखील समाज जिवंत राहील, असे पूनम मेहता यांनी सांगितले.


यावेळी विविध क्षेत्रात ज्या ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा महिला समाज सेविकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून माय होम इंडियाच्या वतीने जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.


यामध्ये वेगरे गावच्या पोलीस पाटील यमुना मरगळे या वेगरे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच येथील महिलांना एकत्र करून अहिल्यादेवी बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नतीसाठी, कोविड व अतिवृष्टी मध्ये ग्रामस्थांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी ,महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे , धनगर कातकरी आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे, ग्रामस्थांना शासकीय योजना मिळवून देणे व गावातील किरकोळ वाद भांडण तंटे गावपातळीवर मिटवणे यासाठी गेले अनेक वर्षे दुर्गम डोंगरी भागात काम करत आहेत.


पुरस्कार वितरण समारंभ सावरकर अध्यायन केंद्र पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व समाज सुधारकांच्या पुस्तकांचा संच देऊन सन्मानित करण्यात आले आहे, यावेळी , संस्थेचे व इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *