अरे योजना बंद करू म्हणताय;तुमच्या बापाची आहे का? अजितदादा “या” पक्षावर भडकले

अरे योजना बंद करू म्हणताय;तुमच्या बापाची आहे का? अजितदादा “या” पक्षावर भडकले

पुणे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे. योजना बंद करावी म्हणून हे कोर्टात जातात. इतकेच नाही तर त्यांनी काँग्रेसलाही सुनावताना ही योजना तुमच्या बापाची आहे का? अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

या योजनेतून महिला भगिनींनी व्यवसाय सुरू केले गोरगरिबांना आम्ही मदत केली. काँग्रेसवाले म्हणतायत आम्ही बंद करू, अरे काय तुमच्या बापाच्या घरचे आहे का? मला बाप काढायचा नव्हता, पण त्यांना विचारायचे आहे की, तुमच्या वडिलांचे घरचे आहे का? जन सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण येथे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे,शिल्पा बेलोसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *