अरेरे !!!!              चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला,पोलिसांकडून संशयित ताब्यात

अरेरे !!!! चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला,पोलिसांकडून संशयित ताब्यात

औरंगाबाद

चोरी करणारे लोक खूप हुशार असतात, चोरी केलेल्या घरात कोणतीही महागडी वस्तू शिल्लक ठेवत नाहीत आणि हो… आपली ओळख पटेल, असा कोणताही पुरावा मागे ठेवत नाहीत, असं ऐकलेलं आहे. मात्र औरंगाबादमध्ये काल झालेल्या चोरीत चोराने भलतीच चूक केली.

ज्या घराचं कुलूप तोडून चोरानं येथील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला, तिथं स्वतःचा मोबाइलच विसरला. चोराच्या या मूर्खपणाची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.शहरातील बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री पाच ते सहा घरे चोरांनी फोडली.

यातील एका घराचे कुलूप तोडून चोराने त्याचा मोबाइल घरात ठेवला आणि चोरी करून जाताना चुकून दुसराच मोबाइल सोबत नेला. घरफोडीची घटना कळताच बेगमपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी एक मोबाइल नव्याने घरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *