पुणे
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात राजेवाडी गावात ट्रॅक्टर ट्रॉली ही व्हॅगनार गाडीवर पडल्याने गाडीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने गाडी रस्त्याच्या कडेला लावून गाडीतील मंडळी खाली उतरली असल्याकारणाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
परंतु गाडीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गाडीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर ट्रॅक्टर वर नेमकी काय कारवाई होणार अशीच सध्या स्थानिकांच्या कुजबूज चालू आहे.
सदर ट्रॅक्टर ट्रॉलीत रेल्वे कामाच्या वायरिंग असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु एवढा मोठा वायरिंग चा बंडल कुठेही पॅकिंग न करता त्या ट्रॉली मधून कशी वाहतूक करू शकतात अशीच खूप मोठी जमलेल्या लोकांची प्रतिक्रिया आहे.
आज गुरुवार बाजारचा दिवस असल्याने सुदैवाने हा ट्रॅक्टर किंवा ही ट्रॉली बाजारात एखाद्या माणसाच्या अंगावर पडली नाही त्यामुळे अशा अवजड वाहतूक करणाऱ्यांवर नेमक कोण कारवाई करणार हाच खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.