अबब !!!!!!!            घर चोरणारांना घरासहीतच केली अटक

अबब !!!!!!! घर चोरणारांना घरासहीतच केली अटक

पुरंदर

फिर्यादी नामे नवाज शेख (वय २४) व्यवसाय साईट सुपरवायझर राहणार कोंढवा बुद्रुक सोमजीवस्ती चंदतारा चौक, पुणे यांनी दिनांक १६/९/२०१९ रोजी सासवड पोलीस स्टेशन येथे चोरीची तक्रार दिली होती. अर्बन रिअल्टी कंपनी पुणे यांची दिवे तालुका पुरंदर येथे जमीन गट नंबर २०२ प्लॉटिंग ची साईट आहे. ऑफिस कामासाठी ऑफिस का कंटेनर बदामी रंगाचा व लाल रंगाचे छत असलेला आत किचन बाथरूम बैठक व्यवस्था असलेले किंमत रुपये ८० हजार होती.

दिनांक ४/९/ २०२१ रोजी १८:०० दिनांक १२/९/२०२१ रोजी १८:३९ वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञान चोरट्यांनी चोरून नेला आहे. सदर बाबत सासवड पोलिस स्टेशन नंबर ३६०/ २०२१ भादविका ३७९, २४ दिनांक १९/९/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी गुन्हे शोध पथकातील गुन्हे उघडकीस आणण्या बाबत सूचना दिल्या होत्य त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के, पोलीस नाईक गणेश पोटे, जब्बार सय्यद, नीलश जाधव, विक्रम भोर, यांनी दिवे सासवड, जेजुरी हडपसरचे वेगवेगळ्या ठिकाणचे सीसी टीव्ही फुटेज तपासले रेकॉर्डवरील असे गुन्हे करणारे आरोपींची माहिती घेतली असे वेगवेगळ्या मार्गाने तपास करीत असताना पथकास गोपनीय बातमी मिळाली की, गुन्ह्यातील घोरपडी पुणे येथील आरोपींनी कंटेनर चोरून याला आहे.

त्याप्रमाणे पथकाने तात्काळ बी टी कवडे रोड घोरपडी मुंढवा पुणे, येथे जाऊन आरोपींची माहिती काढून खालील आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी वरील कंटेनर आम्ही चोरलेला आहे. व तो कंटेनर आम्ही भोर येथील शिंदे गावात डोंगराच्या कडेला ठेवला असल्याचे सांगितले.

यातील आरोपी सुमित सुनील बगाडे वय 23 वर्ष राहणार बी टी कवडे रोड ढोले वस्ती परभणी जिल्हा पुणे, ओमकार नितीन वठारे वय 23 वर्षे राहणार बेटी कवडे रोड प्रोग्रामो सोसायटी कोंढवा पुणे, मिलिंद वठारे वय 20 वर्ष राहणार बी टी कवडे रोड प्रोग्रामो सोसायटी मुंढवा पुणे, संजय शंकर शिगवण वय 39 वर्षे राहणार नरे अभिनव कॉलेज रोड अश्वमेध हाइट्स जिल्हा पुणे याना आटक करण्यात आली आहे.

वरील आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली मारुती वॅगनर आर एम एच १२ एस यु ४६३६ व ऑफिस कंटेनर बदामी रंगाचा व लाल रंगाचे छत असलेले आत किचन बाथरूम बैठक व्यवस्था किंमत रुपये ८० हजार चा जप्त करण्यात आलेला आहे

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक सासवड पोलिस स्टेशन अण्णासाहेब घोलप, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राज्य राजेश माने, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के, पोलीस अंमलदार गणेश पोटे, जब्बार सय्यद निलेश जाधव, विक्रम भोर, सुहास लाटणे, अभिजीत कांबळे, लिकायतअली मुजावर, रुपेश भगत यांचे पथकाने कारवाई केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *