अनधिकृत प्लॉटिंग करताय ????? ; पुणे जिल्ह्यातील “या” अनधिकृत प्लॉटिंगला तहसीलदारांचा दणका

अनधिकृत प्लॉटिंग करताय ????? ; पुणे जिल्ह्यातील “या” अनधिकृत प्लॉटिंगला तहसीलदारांचा दणका

पुणे

दौंड तालुक्यातील भांडगाव येथे बेकायदेशीरपणे शासनाच्या कसल्याही परवानग्या न घेता गुंठेवारी करणार्याला दौंडच्या तहसीलदारांनी दणका दिला असून “शर्त भंग” केले प्रकरणी जमीन सरकार जमा का करणेत येवू नये याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करावा अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे. 

भांडगाव मधील गुंठेवारीच्या गोरख धंदा बाबत अनेक चर्चा असून भांडगावचे  गाव कामगार तलाठी अर्जुन स्वामी यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पंचनामा करत याबाबतचा अहवाल दौंड तहसीलदार यांना सादर केला होता. पंचनाम्या वेळी भांडगाव येथील गट नं.३६३ हि अरविंद गुलाबचंद सोलंकी यांच्या नावे असून सदरील जमीनीमध्ये कोणत्याही प्रकारची अकृषिक परवानगी न घेता बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून त्याची जाहिरात करून विक्री करत असल्याचे दिसून आले होते. तसेच सदर जमिनीमध्ये मोठ्या उंचीची कमान व इतर स्वरूपाचे बांधकाम केलेले आहे.त्याचप्रमाणे उत्तरेस रस्ता ठेवलेला असून रस्त्याचे पशिमेस छोट्या मोठ्या आकाराचे प्लॉट पाडून विक्री करण्याची जाहिरात करत असल्याचे आढळून आले. गटाच्या चारही बाजूंनी तारेचे संरक्षक कुंपण काही जागेत भिंतीचे बांधकाम केलेचे दिसून आले.गटात बनविलेल्या प्लॉटिंगसाठी रस्त्याचे कच्चा मुरूम टाकून बांधकाम केल्याचे दिसून आले होते. 

त्या अनुशंघाने मा. तहसीलदार दौंड यांनी संबंधित जमीन मालकाला नोटीस बजावली असून यात जमीन गट नं. ३६३ मधील क्षेत्रामध्ये अकृषिक परवानगी न घेता अनधिकृतपणे बेकायदेशीर प्लॉटिंग केले असल्याचे व सदर प्लॉटिंग करून अनधिकृत पणे त्याची जाहिरात करून विक्री करत असल्याचे गाव कामगार तलाठी  यांनी केलेला पंचनामा व अहवाल वरून दिसून येत असून तरी सदर प्रकरणी अकृषिक वापराची परवानगी घेणे अपेक्षित असताना अकृषिक परवानगी घेतली असल्याचे दिसून येत नाही यात शर्तभंग केला असल्याचे दिसून येत आहे.तरी सदर जमीन सरकार जमा का करण्यात येवू नये याचा खुलासा तत्काळ करावा अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल. अशी नोटीस बजावण्यात आली आहे. 

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये  कसल्याही कायदेशीर नियमांची पूर्तता न करता सर्वसामान्य नागरिकांना बेकायदेशीर गुंठेवारीतील जमिनींची विक्री केली जात आहे. माळरानावरील ओसाड जमिनी कवडीमोल दराने विकत घेत लाखो रुपयांची कमाई संबंधित विकसक कमावत आहेत. बेकायदेशीर प्लॉटिंग केलेल्या जागेत भविष्यात पी.एम.आर.डी.ए.ने कारवाई केल्यास अशा बेकायदेशीर गुंठेवारीत जमिनी खरेदी केलेल्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. मात्र बेकायदा प्लॉटिंग करणारे  विकसक मात्र बिनधास्त होता आमचे  काय चुकीचे काम नाही अशा फुशारक्या मारल्या जात होत्या. मात्र आता तहसीलदार यांनी सदर जमीन सरकार जमा करण्याची नोटीस बजावल्या आहे, आता नोटीस आल्यावर खरच कारवाई होते का कागदी रंगवून आर्थिक सेटिंग होते अशी चर्चा परिसरात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *