अजित पवार फक्त मतांसाठी मदत मागतात, सन्मानाच्या वेळी टाऴतात : विजय शिवतारे

अजित पवार फक्त मतांसाठी मदत मागतात, सन्मानाच्या वेळी टाऴतात : विजय शिवतारे

पुरंदर

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत भाजप आम्हाला बोलवत असतानाही आम्ही आघाडी धर्म पाळत अजित पवारांना सहकार्य केले.आता त्यांनी स्वतःहून शिवसैनिकास सोमेश्वर कारखान्यात स्वीकृत संचालक पद द्यायला हवे होते.

अजित पवार फक्त गृहीत धरत असतील तर अडचण आल्यावर त्यांना कळेल.मते मागायची आणि सन्मान मात्र द्यायचा नाही याचा अजित पवारांनी विचार करायला हवा होता. याबाबत आमचे सर्वेसर्वा उद्धवजी ठाकरे यांना तक्रार करणार आहे,असा इशारा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला. 

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला संधी दिली नसल्याने माजी मंत्री विजय शिवतरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.शिवतरे म्हणाले की,महाविकास आघाडी बोलायचं आणि मतदान करताना फक्त आम्हाला विश्वासात घ्यायचं पीएमआरडीएला मला मदत करायला सांगितली.

त्यावेळेस कॉँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला होता आम्ही आमची १९ मतांची मदत केली त्यामुळेच राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला जर आम्ही मदत केली नसती तर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पडला असता.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस भाजप आम्हाला बोलावत होती पण मात्र त्या वेळी  स्पष्टपणे जाहीर केलं ती की आम्ही भाजपबरोबर जाणार नाही.

अजित पवार जर शिवसेनेला गृहीत धरत असतील आणि  शिवसेनेला संधी देत नसतील,तर असं चालणार नाही त्यांनी स्वत हून शिवसेनेला स्वीकृत संकलक पद द्यायला हवं होतं ते म्हणतात शिवसेनेचं  सहकारामध्ये काय ? मंग मत फक्त आमची घ्यायची तो मान सन्मान आम्हाला द्यायचा नाही मग अडचणीची वेळ येईल तेव्हा कळेल. 
         
अजित पवारांनीही विचार करायला हवा होता याबाबतची निश्चित मी एक तक्रार उद्धवजी ठाकरे यांना देणार आहे. ते आम्हाला सांगतात महाविकास आघाडी मध्ये  नीट वागा आणि हे मात्र आमचा उपयोग करून घेतात.वर चांगलं चालले असेल पण खाली परिस्थिती अवघड आहे.त्यांनी निश्चित सैनेच्या एका उमेदवाराला संधी द्यायला हवी होती.

मतदान मागताना आम्हाला जिल्हाप्रमुखांनी फोन करायचा. ते असंच वागत असतील तर काय उपयोग नाही पुरंदरमध्ये आमची एक लाख मते आहेत ती तुम्हाला जर लोकसभेला नको असतील तर तसं सांगावे.

जिल्हा प्रमुखांमार्फत आमची मदत मागायचे कारखान्याला मदत करा,बँकेला मदत करा,जिल्हा परिषदला मदत करा आता सगळीकडे मदत करायची यामुळे मी नाराजी व्यक्त करत याबाबत पक्षश्रेष्ठींकडे  तक्रार  करणार असल्याचे विजय शिवतरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *