अजब वाढदिवस !!!!!! कोयत्याने केक कापला पण आनंद जास्त काळ नाही टिकला

अजब वाढदिवस !!!!!! कोयत्याने केक कापला पण आनंद जास्त काळ नाही टिकला

दौंड

दौंड तालुक्यातील पाटस येथे काही दिवसांपुर्वी वरवंड येथील एका मित्राचा वाढदिवस पाटस येथील एका मित्राने पाटस येथील भर चौकात साऊथ फिल्म स्टाईल धारधार कोयत्याने केक कापून साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे.या प्रकरणी पाटस पोलीसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला असून केक कापणारा मित्राला अटक केली आहे.

ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली. वरवंड येथील वाढदिवस असलेला अल्पवयीन मुलगा व गणेश पोपट दळवी (रा. पाटस सोनवणे मळा, इडियन पेट्रोल पंपाशेजारी ता.दौंड जि.पुणे ) अशी वाढदिवस साजरा केलेल्या दोघांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *