पुणे
बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. नोकरी नसल्याने अनेकांचे लग्न जमत नसल्याचे देखील पाहावयास मिळाले आहे. अशाच काही बेरोजगार युवकांनी आपले गाऱ्हाणे मांडून ‘घर द्या किंवा बायको द्या..’ असे अजब साकडं शासनाकडे मांडले आहे.
राज्यभरात लाखो युवक उच्चशिक्षित होऊन बेरोजगार आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी नसल्याने त्यांना लग्नात या गोष्टीचा अडथळा निर्माण होत आहे. बेरोजगार युवकांना घर नसल्याने कोणीही लग्नात मुलगी देण्यास तयार नसतं.
अनेक युवकांचे वय हे ३५ ते ३८ च्या दरम्यान पोहोचले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी आज संग्रामपूर पंचायत समितीवर घर द्या किंवा बायको द्या असं म्हणत मोर्चा काढला.
युवकांनी सुरुवातीला संग्रामपूर येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानालाही साकडं घातलं. हनुमानासमोर घर द्या किंवा बायको द्या अशा घोषणाही या युवकांनी लावल्या. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा होत आहे. सध्याही हे युवक पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देऊन आहेत.