अखेर ठाकरे सरकार कोसळलं !!!!!   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

अखेर ठाकरे सरकार कोसळलं !!!!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

मुंबई

एकनाथ शिंदे  यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आपल्यासोबत तब्बल 45 आमदार असल्याचा दावा शिंदेनी केला आहे.त्यानंतर मात्र शिवसेनेचे दोन गट स्पष्टपणे दिसून येत होते. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता. शेवटी आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची  घोषणा केली. हे वृत्त अनेकांना धक्का देणारं आहे.

22 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांना कायदेशीर बाबी करण्यात रस नव्हता. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं.

आजही कॅबिनेट बैठकीपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी उद्धव ठाकरेंना कोणताही मोठा निर्णय घेऊ नका असं सांगितलं होतं.

मात्र पक्षात फूट पडल्यानं उद्धव ठाकरे नाराज झाले होते. आज सकाळी त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाला मानसिक आवाहन करणारं पत्रही लिहिलं होतं. यात त्यांनी सर्व शिवसैनिकांनी परता असं नमूद केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *