अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीने नायगाव येथे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न

अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीने नायगाव येथे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न

पुरंदर

अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांच्या वतीने नायगाव येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल प्रा.दिगंबर दुर्गाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीने विविध प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना हेल्थ किटचे वाटप व सॅनिटायजर वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, पुरंदर तालुक़ा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व दौंड शुगर चे अधिकारी गणेश ढोले,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश कड, गौरव कोलते,पिसर्वे गावचे सरपंच बाळासाहेब कोलते, सिद्धेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रदिप खेसे,प्रकाश मारणे,मांडकी शाखेचे व्यवस्थापक मंगेश घोणे,नायगावचे सरपंच बाळासाहेब कड, नायगावचे माजी सरपंच दत्तात्रय कड, नायगावचे उपसरपंच दत्तात्रय दरेकर, सदाशिव खेसे, पारगावचे मुख्याध्यापक तुकाराम मुळीक, अनिल शेंडगे, सदाशिव चौंडकर, बाळासाहेब कड,सिद्धनाथ कड,विजय कड, सागर होले, संतोष गायकवाड, महेश कड,चंद्रकांत चौंडकर,संजय होले,दिलीप मोरे, संतोष खेसे,सुभाष चौंडकर,संतोष कड, अजिंक्य कड,वैभव तावरे व इतरही नायगाव,पोंढे,वाल्हे, जेजुरी,राजुरी, पारगाव,रिसे,पिसे या गावातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.

अक्षरसृष्टी संस्था पुरंदर तालुक्यातील विविध भागात सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले तसेच संचालक पदाच्या निवडणुकीत नायगाव ग्रामस्थांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले असे दुर्गाडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *