हे महादेवा मला मंत्री करा,सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करा;पुण्यातील भर कार्यक्रमातच “या” आमदाराने महादेवालाच घातले साकडे

हे महादेवा मला मंत्री करा,सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करा;पुण्यातील भर कार्यक्रमातच “या” आमदाराने महादेवालाच घातले साकडे

पुणे

अजून मी मंत्री झालो नाही. परंतु, आता प्रभू श्री रामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी अशा आहे. इथल्या महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरण ही होणार आहे.

त्यामुळे हे महादेवा मला मंत्री करा. सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, असे शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी थेट महादेवालाच साकडे घातले आहे.

पुणे शहरात हडपसर हांडेवाडी रोड भर चौकात शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे, या शिल्पाचे भूमीपूजन माजी खासदार आढळराव पाटील शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, पूजा रावेतकर, तुषार गंभीर, शरद मोहोळ, लक्ष्मण अरडे आदी उपस्थित होते. हांडेवाडी रोड श्री राम चौकात अकरा फूट प्रभू श्रीरामाची पुतळा असणार आहे. स्मारकाची लांबी ७५ फूट, उंची २१ फूट असणार आहे, त्यासोबत परिसरात हिरवळीचा गालिचा आणि जेष्ठ नागरिकांचा कट्टा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *