वाघापूर दि.२८ (वार्ताहर)
पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या राजेवाडी गावात बाजार तळातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबळे कडून सासवड कडे जाताना किंवा वाघापूर कडून यवत कडे जाताना या ठिकाणी राजेवडी गाव लागते. या गावात आठवडा बाजार भरतो पण बाजारतुन पुढे जाताना स्पीड ब्रेकर लागतो.या स्पीडब्रेकर अगोदर खुप मोठे खड्डे रस्त्यावर पडलेले असुन याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असून अपघात झाल्यानंतरच या ठिकाणी रस्ता व्यवस्थित होणार का? असा प्रश्न सध्या प्रवाशांना पडलेला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी या ठिकाणी पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.
फक्त आमदार खासदार भूमिपूजन करून जाणार, काम झाल्यानंतर तो रस्ता किंवा त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती कोणी करायची असा खूप मोठा प्रश्न या ठिकाणच्या ग्रामस्थांना व प्रवाशांना पडलेला आहे.