हारतुरे आणले, शहरभर बॅनर लावले, अजितदादा पोहोचण्याआधीच शिंदे गटात प्रवेश केला !!!!!

हारतुरे आणले, शहरभर बॅनर लावले, अजितदादा पोहोचण्याआधीच शिंदे गटात प्रवेश केला !!!!!

सोलापूर 


सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. राष्ट्रवादीमधील स्थानिक नेते व पदाधिकारी हे शहर आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून पक्ष सोडून जात आहेत. अजित पवार व जयंत पाटील हे १ जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.

१ जूनच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्योतिबा गुंड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोलापूर राष्ट्रवादीमधील पदाधिकारी व पक्ष निरीक्षक यांच्या कामकाजाला किंवा मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी सोडून जात असल्याची खंत व्यक्त केली.

अजित पवारांच्या स्वागताला जवळपास सव्वा लाख रुपये खर्च करून हारतुऱ्यांचा बंदोबस्त केला. शहरभर बॅनर लावले, मोठी जय्यत तयारी केली होती पण वरिष्ठ नेत्यांना कंटाळून शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना बोलताना दिली.

गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते दिलीप कोल्हे यांनी पक्ष निरीक्षक, शहराध्यक्ष यांवर विविध आरोप करत पक्षाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला होता. ३१ मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीमधील व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी शहराध्यक्ष, पक्ष निरीक्षक यांवर विविध आरोप करत शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशावेळी शिंदे गट शिवसेनेतील विविध नेते उपस्थित होते. सोलापूरचे पक्ष निरीक्षक पक्षाकडे जातीने लक्ष देत नाहीत, असा आरोप ज्योतिबा गुंड यांनी केलाय.

ज्योतिबा गुंड यांनी अजित पवार व जयंत पाटील यांच्या सोलापूरमधील स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. अजित पवार यांच्या दौऱ्याअगोदर शिंदे गटाच्या नेत्यांनी संधी साधत मोठा पक्ष प्रवेश कार्यक्रम सोहळा पार पाडला. ज्योतिबा गुंड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळपास सव्वा लाख रुपयांचे हारतुऱ्यांची ऑर्डर दिली होती.

सोलापुरात शहरभर स्वागतासाठी बॅनर लावले होते. मात्र बुक केलेले हारतुरे अजित पवार आणि जयंत पाटलांच्या गळ्यात पडण्याअगोदर गुंड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *