स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने सार्थक सेवा संघास पौष्टिक आहार भेट

स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने सार्थक सेवा संघास पौष्टिक आहार भेट

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील आंबळे याठिकाणी असणार्या सार्थक सेवा संघ संचलित सार्थक आश्रमास स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने पौष्टिक आहार भेट देण्यात आला आहे.

सार्थक आश्रमात जवळपास ८४ मुले राहतात. या मुलांच्या आहाराकडे संघाचे पुर्णपणे चांगले लक्ष असते. प्रतिष्ठानच्या वतीने या मुलांना सकस व पौष्टिक आहार भेट देण्यात खुप आनंद वाटत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगीतले.

या कार्यक्रमासाठी पुरंदर हवेलीचे मा.आमदार अशोक टेकवडे,प्रतिष्ठानचे अघ्यक्ष संतोष जगताप,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष पुष्कराज जाधव,अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष नाजीम शेख,आंबळेचे उपसरपंच सचिन दरेकर,मा.सदस्या संजिवनी गायकवाड,संदिप जगताप,यशवंत शेंडगे जि.प.शाळा शिक्षक कैलास वारे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *