सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सासवड (ता. पुरंदर )येथे दिनांक 22 आणि 23 जून असे दोन दिवस मुक्कामी येत आहेत, 24 जूनला हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्या अनुषंगाने दिवेघाटावरील झेंडेवाडी चा विसावा, सासवड येथील पालखी तळ, बोरावके मळा येथील विसावा, आदी ठिकाणचा पहाणी दौरा केला असून, पालखी सोहळा कालावधीमध्ये पालखी तळावर येणाऱ्या रस्त्याबाबतच्या अडचणी, तसेच विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, याबाबत चर्चा करून, जिल्हाधिकारी व आळंदी संस्था तर्फे सूचना करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यासह पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासो आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळकृष्ण मोरे, दिंडी समाज संघटना सचिव मारुती महाराज कोकाटे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, अजित जगताप, सुहास लांडगे, नायब तहसीलदार सोनाली वाघ, बांधकाम विभागाच्या अभियंता स्वाती दहिवाल, पालिका आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, गट विकास अधिकारी पंकज शेळके, आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आदी उपस्थित होते.