सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम तर्फे पुरंदरच्या अति दुर्गम भागातील तब्बल एैंशी कुटुंबाना किराणा किट वाटप

सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम तर्फे पुरंदरच्या अति दुर्गम भागातील तब्बल एैंशी कुटुंबाना किराणा किट वाटप

पुरंदर

सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम तर्फे पुरंदरच्या अति दुर्गम भागातील ऐंशी कुटुंबाना किराणा किट वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

देवडी,चिव्हेवाडी व मिसाळवाडी या गावांमध्ये “सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम”यांच्या वतीने कै. बुद्ध प्रकाश देविदास सुरवसे यांच्या स्मरणार्थ अपंग, निराधार महिला, गोरगरीब कष्टकरी 80 नागरिकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरवसे सर व त्यांचे संपूर्ण कुटुंब,साठे सर,गायकवाड सर, आबा जगताप तसेच तिन्ही गावचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *