संतापजनक !!!!!    आधी हात पाय बांधले,महिलेला विवस्त्र करत पेटलेल्या माचिसच्या काड्या तिच्या ….. टाकल्या ; व्हिडिओ बनवत महिलेवर क्रुरपणे अत्याचार

संतापजनक !!!!! आधी हात पाय बांधले,महिलेला विवस्त्र करत पेटलेल्या माचिसच्या काड्या तिच्या ….. टाकल्या ; व्हिडिओ बनवत महिलेवर क्रुरपणे अत्याचार

मुंबई

मुंबईतल्या खार येथे परदेशी तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच, आता कुर्ला परिसरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ४२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तीन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आहे. कुर्ल्यातील इंदिरा नगर, बोरी गार्डन परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे.

याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बबलू, वसीम आणि मुन्ना अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच, तिघेही फरार झाले आहेत. पोलिसांचं एक पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय पीडित महिला कुर्ला शहरातील इंदिरानगर परिसरात राहते.आरोपी बबलू, वसीम आणि मुन्ना हे तिघेही जबरदस्तीने पीडित महिलेच्या घरात घुसले. त्यानंतर पीडितेला शिवीगाळ करत तिचे हातपाय बांधले. तसेच महिलेला विवस्त्र करत पेटलेल्या माचिसच्या काड्या तिच्या गुप्तांगावर टाकल्या.

आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी महिलेवर क्रूरपणे अत्याचार केला. तसेच अत्याचार करतानाचे व्हिडीओही बनवले.आरोपींची ही विकृती इतक्यावरच थांबली नाही तर, त्यांनी महिलेच्या केसाला धरून फरफटत नेलं. त्याचबरोबर तिच्या छातीवर आणि हातावर चाकूने वार देखील केले.

या प्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार कुर्ला पोलिसात बबलू, वसीम आणि मुन्ना या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांचं एक पथक आरोपींच्या शोधात असल्याची माहिती आहे. तर पीडित महिलेवर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *