श्री.मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाख रुपयांचा निधी सुपूर्द!

श्री.मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाख रुपयांचा निधी सुपूर्द!

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी

माननीय पि.एस.तरारे साहेब, धर्मादाय आयुक्त,महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्रातील न्यासांना अतिवृष्टी झालेल्या भागातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान केले होते. त्या आवाहनास अनुसरून श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाने मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ११,००,०००/(अकरा लक्ष) रुपयांचा निधी देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उद्धवजी ठाकरे साहेब यांचे वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन धनादेश, श्री खंडेरायाची प्रतिमा व भंडारा, प्रसाद तसेच राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचा पुतळा स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आला. व जेजुरी गड विकास आराखडा अंतर्गत भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानण्यात आले.

जेजुरी पंचक्रोशी मधील महिलांकरिता विनामूल्य सर्व सोयीयुक्त प्रसूतिगृह बांधण्याचा देव संस्थानचा मानस असून त्याच्या भूमिपूजनासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना येण्याची विनंती केली.

तसेच लॉकडाऊन मुळे मंदिर गेले दीड वर्षापासून भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद आहे. विविध भागातील लोकांची मंदिर दर्शनासाठी उघडण्याची मागणी व जेजुरी मधील सर्व समाजातील लोकांची आर्थिक उलाढाल ही पूर्णपणे खंडोबा मंदिरावर अवलंबून असल्याने स्थानिक लोकांच्या उपजीविकेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासन आदेशानुसार सर्व अटी नियमांचे पालन करून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी अशी विनंती विश्वस्त मंडळातर्फे माननीय प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी मा.मुख्यमंत्री साहेबाना केली.

यावेळी देवसंस्थान प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील, विश्वस्त तुषार भिवाजी सहाणे, विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे, विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त Adv.अशोक संकपाळ, विश्वस्त शिवराज झगडे व मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *