सोलापूर
सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एका शेतकऱ्याने 17 पिशवीतील 825 किलो कांदा विकला, त्यानंतरही त्याला आपल्याच खिशातील एक रुपया द्यावा लागला. यामुळे सर्वसामान्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून शेतकरी वर्गातही असंतोषाचं वातावरण आहे.