शेतकर्यांची ताकद दाखउन देऊ -शशिकांत शिंदे

शेतकर्यांची ताकद दाखउन देऊ -शशिकांत शिंदे

सातारा

जरंडेश्‍वर साखर कारखाना सुरुच राहिला पाहिजे, ईडीने जर राजकीय खेळातून जरंडेश्‍वर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्नकेल्यास, ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची ताकद निश्‍चितपणे दाखवून देऊ, असा स्पष्ट इशारा ऊसउत्पादक शेतकरी, वाहतूकदार व कामगार यांच्या बैठकीत बोलताना शशिकांत शिंदे यांनी दिला.

जरंडेश्‍वर साखर कारखाना हा शेतकरी हिताचा निर्णय घेणारा जिल्ह्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. सर्वच बाबतीतअग्रेसर असलेल्या या कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारखाना चालू राहिला तर, ५० हजार ऊस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळणार आहे, जर कारखाना बंद पाडण्याचाकोणी प्रयत्न केला तर शेतकरी शांत बसणार नाहीत. जरंडेश्‍वर साखर कारखाना हा जरी डॉ. शालिनीताई पाटील यांनीकाढला होता, हे मान्य असले तरी त्यांना तो चालविता आला नाही, हे कटू सत्य आहे. २०१० सालापर्यंत २५०० मेट्रिक टनक्षमतेचा हा कारखाना होता, आज हा कारखाना १० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने चालत असून, वीज निर्मितीसह डिस्टलरीची उभारणी केली आहे. आज कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार तयार झाले असून, ५० हजारांपेक्षाजास्त शेतकर्‍यांना त्याचा लाभ होत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उच्चांकी दर देणारा आणिवेळेवर पेमेंट करणारा हा कारखाना असल्याने शेतकरी त्यालाच ऊस घालत आहेत. केवळ ‘कोरेगाव-खटाव’ तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बरेच शेतकरी जरंडेश्‍वर कारखान्यावर अवलंबून आहेत, यापुढे सर्वपक्षीयकार्यकर्त्यांना विचारात घेऊन गावनिहाय मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणिजिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्ते घरोघरी जाऊन आपले विचार मांडतात, त्याच धर्तीवर कारखाना कसा होता आणिआता काय परिस्थिती आहे, हे शेतकर्‍यांना पटवून दिले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये गावनिहाय बैठकांचे नियोजनकेले जाणार आहे.

ईडी ही राजकीय बाहुली आहे, हे सतत दिसून येते. काहीही झाले की, भाजप ईडीचे नाव घेते. ईडीचे सामान्य जनतेपुढे काहीच चालत नाही. केवळ राजकीय हेतूने खा. शरद पवार यांना चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर मुंबईत कायपरिस्थिती निर्माण झाली होती, याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती, मोठा फौजफाटा आणला होता, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीपुढे सर्वच यंत्रणा हतबल ठरल्या. वरिष्ठ अधिकार्‍यांनीखा. शरद पवारसाहेब यांचे निवासस्थान गाठले, व ईडीला सांगावे लागले की, आम्ही चौकशीला बोलावलेच नाही. एवढीमोठी ताकद तुमच्या-आमच्यात आहे. मुंबईत जसा इतिहास घडविला, तसाच इतिहास सातारा जिल्ह्यात जरंडेश्‍वर कारखाना प्रश्‍नी सर्वसामान्य ऊसउत्पादक शेतकरी घडवतील, यात तीळमात्र शंका नाही. ईडी येऊ अथवा अन्य कोणी, आम्ही एकदा का रस्त्यावर उतरलो की, आमची ताकद निश्‍चितपणे कळून येईल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जर म्हणत असतील की, आम्ही ४१ कारखान्यांची तक्रार केली आहे, मग एकाच जरंडेश्‍वर कारखान्यावर कारवाई का केली, त्याबाबत आता भाजप का बोलत नाही. कोणत्याही परिस्थितीत ईडीच्या अधिकार्‍यांना कारखाना बंद करु देणार नाही, राजकीय द्वेषातून हा कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची ताकद काय आहे, हे ईडीला आणि केंद्र सरकारला दाखवून देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *