शपथविधीत वळसेंचं नाव आलं अन् गडी बिथरला;हा काय एवढा मोठा नेता आहे का ओ?अरे सगळी तुझी अंडी पिल्ली मला माहिती आहेत

शपथविधीत वळसेंचं नाव आलं अन् गडी बिथरला;हा काय एवढा मोठा नेता आहे का ओ?अरे सगळी तुझी अंडी पिल्ली मला माहिती आहेत

पुणे

ज्यावेळी सर्वांच्या मताने चांगला निर्णय घेण्याचे ठरले, त्यावेळी सर्वांनी मला एफिडेविट करून दिले. त्यामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार देखील होते. ज्यावेळी शपथविधी पार पडत होता. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांचं नाव आला, तिथे गडी बिथरला. दादांनी यांना शपथविधीसाठी परवानगी द्यायला नको होती. मला हे अजिबात आवडलेलं नाही. आता मी बाहेर पडणार, असे म्हणत अशोक पवार बाहेर पडले होते.

तुम्ही सांगा हा काय मोठा नेता आहे का? बेटा तुला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, तुझी सगळी अंडी पिल्ली मला माहित आहेत, असा टोला लगावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांची पोलखोल केली आहेहवेली तालुक्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. त्यावेळी अजित पवार यांनी ही तोफ डागली.यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी आमच्या घरी मी बसलो होतो.

डॉ. कोल्हे होते, अशोक पवार होते. सगळ्यांनी आपण हा चांगला निर्णय घेतला पाहिजे म्हटलं. सगळेजण माझ्या सोबत शपथविधीसाठी आले, कोल्हे साहेबांनी प्रतिक्रिया दिली. अशोक पवार मला म्हणत होते, दादा सत्ता असल्याशिवाय काय खरं नाही, असं सतत मला सांगणाऱ्यांपैकी तो एक होता. पण ज्या वेळेत शपथविधी पहिली मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी किंवा चौथी शपथ दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला.

तो म्हणाला ही शपथ घ्यायला दादांनी परवानगी द्यायला नको होती. मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही. हा काय एवढा मोठा नेता आहे का ओ? अरे काय तू… तुला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो? असा सवाल अजित पवारांनी विचारला.इथे येऊन अशोक पवारांनी सांगितले, मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे. ते म्हणाले तर मी राजीनामा देखील देईन.

अरे सगळी तुझी अंडी पिल्ली मला माहिती आहेत. या तू गप्पा मारतो. उगीच मी आपलं कुणाची भावकी आहे म्हणून आपलं काही निंदानालस्ती करत नाही. भावकी कुणाची वाटेकरी आहे हे माहीत आहे. असे म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *