वाह रे पठ्ठ्या !!!!!!! पुण्यात पोलिस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपी,मास्कमध्येच मोबाईल,मास्क बनवणारा कॉन्स्टेबल जेरबंद

वाह रे पठ्ठ्या !!!!!!! पुण्यात पोलिस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपी,मास्कमध्येच मोबाईल,मास्क बनवणारा कॉन्स्टेबल जेरबंद

पुणे

पिंपरी चिंचवड पोलिस भरती लेखी परीक्षेत कॉपीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. मास्कमध्ये मोबाईल बसवून परीक्षा देण्यास आलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला मास्क बनवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. राहुल गायकवाड असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे तो औरंगाबादमध्ये पोलिस कॉन्स्टेबल आहे.

पोलिस भरती लेखी परीक्षेत नितीन मिसाळ हा परीक्षार्थी मास्क घेऊन आला होता. ‘मुन्नाभाई’ नितीन मिसाळला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. याशिवाय, रामेश्वर शिंदे आणि गणेश शिंदे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

ते दोघे परीक्षार्थी नितीन मिसाळला उत्तरं सांगण्यासाठी मदत करणार होते. हिंजवडी ब्लू रिडज शाळेतील परीक्षा केंद्रावर तपासणीसमध्ये ही कॉपीची ही नवी धक्कादायक पद्धत समोर आली होती.

मास्क चेक करत असतानाच हा कॉपी बहाद्दर हॉल तिकीट विसारल्याचा बहाणा करून पसार झाला होता. त्याला देखील अटक करण्यात आली.

N95 चा हा मास्क पोलिसांनी तपासला असता त्यात मोबाईलची बॉडी वगळता जी उपकरणं असतात, ती सर्व बसवण्यात आली होती. म्हणजेच मोबाईल डिव्हाईस, सिम कार्ड, बॅटरी, चार्जिंग कनेक्टर यांचा मास्कच्या आत समावेश करण्यात आला होता.

मास्कमध्ये मोबाईल बसवून देऊन परीक्षार्थीला मदत करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी अटक केलेला राहुल गायकवाड हा औरंगाबादमध्ये पोलिस कॉन्स्टेबल आहे.

आणखी काही परीक्षांमध्ये अशी पद्धत वापरली असल्याचं समोर आलं आहे. त्यासंदर्भात हिंजवडी पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र कॉपी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या हायटेक पद्धतींमुळे सर्वच चक्रावून गेले असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *