राजेवाडीत रक्तदान शिबीर संपन्न

राजेवाडीत रक्तदान शिबीर संपन्न

पुरंदर 

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील राजेवाडी याठिकाणी संत निरंकारी मंडळ रजी. दिल्ली शाखा राजेवाडी यांच्या वतीने वससुन रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहयोगाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

निरंकारी सद्‌गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आसिम कृपाशिर्वादाने संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन शाखाराजेवाडी पुणे झोन च्या माध्यमातुन शिबीर आयोजित केले होते यामध्ये तब्बल ९० जनांणी रक्तदान केले.

पुणे झोनचे प्रभारी ताराचंद फरमचंदानी यांचे मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात गरजेनुसार रक्तदान शिबीर संपन्न होतआहेत.

या रक्तदान शिबीराचे उद्घाटन राजेवाडीचे सरपंच रामदास जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेक्टर संयोजकविकास रासकर,हनुमंत थोरात,भारती घोरपडे,विलास खेड़ेकर,लक्ष्मण कडलग,संभाजी जगताप,गौतम जगताप,शरदराऊत,गजानन जगताप, संजय भाऊ,आंबळे गावचे उपसरपंच सचिन दरेकर,राजेंद्र शिंदे,दत्तात्रय जगताप,बापु खेड़ेकर आदीमान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबीरास आलेल्या सर्वच मान्यवरांचे आभार सुभाष इंदलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *