मोकाट पाळीव डुकरांचे समूळ उच्चाटनासाठी निरेत होणार मुंडन आंदोलन.

मोकाट पाळीव डुकरांचे समूळ उच्चाटनासाठी निरेत होणार मुंडन आंदोलन.

निरा

निरा शिवतक्रार गावात फिरणाऱ्या मोकाट पाळीव डुकरा मुळे मंदिरे,  मशिदी, स्मशानभूमी या ठिकाणी धार्मिक भावनादुखावणे. डुकरा मुळे होणारे अपघात,   निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न, शेतीचे नुकसान, दूषित होणारे पाणी आणिव्यापाऱ्यांचे होणारे नुकसान इत्यादी प्रश्न निर्माण होत असलेले लोकभावनेचा आदर करून मोकाट पाळीव डुकरांचे समूळउच्चाटन व्हावे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर सामाजिक संघटना गेले वर्षभरापासून उपोषणआंदोलनाद्वारे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करीत आहे.

स्वच्छ निरा, सुंदर निरा कागदावरच ब्रीद वाक्य असलेले ग्रामपंचायत निरा शिवतक्रार प्रशासन जनतेच्या आरोग्याचा प्रश्नहाताळण्यात अपयशी ठरलेले असून त्यांची मोकाट पाळीव डुकरांचा प्रश्न हाताळण्यात उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे गावात गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

त्यामुळे लोकभावनेचा आदर करून मोकाट पाळीव डुकरा पासून निरा शिवतक्रार गाव मुक्त करावे या मागणीकरिताअखिल भारतीय मराठा महासंघ, मुस्लिम सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, (आंबेडकर) यांचेवतीने दिनांक ९ ऑगस्ट  २०२१ रोजी सकाळी १०:००  वाजता क्रांतिदिनी छत्रपती शिवाजी महाराजचौक,ग्रामपंचायतीसमोर, निरा शिवतक्रार येथे मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने याही आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढील मूकं निदर्शने आंदोलन मा. अजित दादा पवार सौ. पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे बारामती येथील निवासस्थानासमोर करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *