महेश राऊत यांनी वीर भिवडी गटाच्या अध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

महेश राऊत यांनी वीर भिवडी गटाच्या अध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

पुरंदर

पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे वीर-भिवडी गटाचे अध्यक्ष महेश राऊत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडेपाटील यांच्याकडे सुपुर्त केला आहे.

गेल्या तीन वर्षापासुन महेश राऊत हे वीर-भिवडी गटाचे अध्यक्ष होते.त्यांनी तीन वर्ष अध्यक्ष पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळली.

मला माझ्या वैयक्तिक व घरगुती कारणास्तव अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडता येणार नाही त्यामुळे मी स्वत:हुन राजीनामा देत असल्याचे महेश राऊत यांनी सांगीतले.

आता महेश राऊत यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा तालुकाध्यक्ष स्वीकारणार की नाही हे पाहणे औस्त्युक्याच ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *